पारनेर

ऐ बाबो…! मुलानेच घोटला बापाचा गळा..!

पारनेर:- गेल्या महिन्यांत निघोज येथील कुंडावरील नगर पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या कुकडी नदीत धान्याच्या पेटीत कोंबून फेकून दिलेल्या खुनाचा तपास लावण्यात पारनेर पोलिसांना यश आले असून मयताच्या मुलानेच मित्रांच्या साहाय्याने बापाचा मिर्चीची पूड डोळ्यात फेकून बेल्टने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी मयताचा मुलगा प्रदीप सतिष कोहकडे, त्याचे मित्र हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे सर्व रा. कारेगाव ता.शिरूर जि. पुणे या तिघा जनांसह दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या पूर्वी खून करून मृतदेह धान्याच्या पेटीत कोंबून निघोज कुंडावरील नदीत फेकून दिला होता, खून करणाऱ्यांनी पोलिसांना पुरावे मिळूनयेत याची विशेष दक्षता घेतली होती. याप्रकरणी टाकळी हाजी चे माजी सरपंच दामू धोंडीबा घोडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, त्यानुसार पारनेर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पारनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी सह सायबर विभागातील तज्ञ अधिकारी, कर्मचारी यांनी भेट दिली होती. पुरावे नष्ट केल्याने या खुनाचा तपास लावने पोलिसांना एक प्रकारचे आव्हानच होते. स्थानिकांच्या मदत घेत सोबत मिळून आलेल्या वस्तूंच्या आधारे परिसर पोलिसांनी पिंजून काढला होता. धान्याच्या पेटीत मृतदेह आढळून आल्याने हॉटेलसह सर्वत्र पोलिसांनी शोध मोहीम राबवली होती मात्र त्यात कुठलेही धागेदोरे हाती आले नाही. शेवटी अचानक 11 सप्टेंबर रोजी या मयताशी मिळती जुळती मिसिंग पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलीस स्टेशनला दाखल झाल्याचे कळताच पारनेर पोलिसांनी रांजणगाव गाठुन माहिती घेतली आणि समोर आले ते गुन्ह्याचे वास्तव….

सतीश सदाशिव कोकडे वय 49 वर्ष रा. कारेगाव ता.शिरूर येथील दि. 25 रोजी पहाटेपासून बेपत्ता असल्याची मिसिंग दाखल असल्याची माहिती पारनेर पोलीसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी ओळखपटविणेकामी बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाईकांना बोलावून घेतल्यानंतर या मयताच्या कपडे, हातातील दोरा, वस्तूंची काही फोटो दाखविले असता नातेवाईकांनी ही व्यक्ती सतिष कोहकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार पारनेर पोलीसांनी परिसरात माहिती घ्यायला सुरुवात केली त्यानुसार गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, वडील आपल्या आईला योग्य वागणूक देत नव्हते तसेच शेतीचे व घर भाड्याचे येणारे आर्थिक उत्पन्न हे दुसऱ्या महिलेला देत आहेत. याचा राग मनात ठेवून या पती-पत्नी दोघांमध्ये अनेक वेळा वाद होत होता 23 ऑगस्टला मयताने त्याच्या पत्नीला मारहाण केली आणि तोच राग मनात ठेवून मुलाने मित्रांच्या मदतीने राहत्या घरामध्ये बाप नशेत असताना बापाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तोंड दाबून धरत कापडी पट्ट्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली पारनेर पोलिसांना दिली आहे.पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे निळ्या रंगाच्या मारुती कार मधून मृतदेह निघोज कुंडावर आणून पुलावरून खाली फेकून दिला आणि शिरूर तालुक्यातील करडे येथील घाटामध्ये मयताच्या गाडीचा अपघाताचा बनाव रचून मारुती कार दरीत सोडून दिल्याची कबुली या आरोपींनी पोलिसांना दिली आहे.


गुन्ह्याचा तपास करत असताना पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, दत्ता चौगुले,सत्यजित शिंदे यांचा पूर्वीपासूनच शिरूर परिसरात संपर्क चांगला आहे.त्यानुसार त्यांनी त्यांची यंत्रणा वापरून या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींपर्यंत पोहोचण्यात त्यांना मदत झाली
त्यामुळे या गुन्ह्याची उकल करने पोलिसांना पुरावे नसताना अधिक सोप्पे गेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पारनेर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे करीत आहेत……
तुषार भाटीया, पारनेर

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी