पारनेर:- तालुका तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या काळात रक्ताची कमतरता जाणवू लागल्याने मंगळवार दि. 29 रोजी भव्य असे रक्तदान शिबीर कन्हेर ओहोळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सोशल डिस्टन्सिंग चे पालन करीत आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उदघाटन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते पार पडणार असून यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पारनेर शहरातील हे प्रथमच रेकॉडब्रेक असे भव्य रक्तदान शिबीर असणार आहे. या मध्ये नगर येथील आनंदऋषी ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक,जनकल्याण रक्तपेढी,अष्टविनायक रक्तपेढी या चार रक्तपेढ्यांच्याद्वारे हे रक्तसंकलित केले जाणार आहे. पाचशेच्यावर रक्त पिशव्यांचे संकलन केले जाणार असून नागरिकांनी रक्तदान करून या कोरोना काळात रक्ताचा तुटवडा दूर करण्यास या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन युवराज पठारे यांनी केले आहे.
कोरोनासंकट असताना लॉकडाऊनच्या काळात देखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून एक मदतीचा हात देत शहरातील अनेक कुटुंबांना युवराज पठारे यांनी किराणारुपी भेट देत आधार दिला होता. तसेच शहरातील परिसरात निर्जंतुकीकरणाची फवारणी करत सॅनिटायझर व मास्कचे देखील वाटप केले होते.
कुस्ती क्षेत्रात युवराज यांनी देखील पिढीजात नावलौकिक मिळविलेले असून अस्सल मातीतील पहिलवान कोल्हापूरच्या धर्तीवर पारनेरमधेच शिवछत्रपती कुस्ती संकुलनाच्या माध्यमातून घडविण्याचे काम सुरू आहे…….
तुषार भाटीया, पारनेर
Add Comment