पारनेर भ्रष्टाचार

च्यायला छे..! हद्दच पार केली राव स्मशानातील सरपणाचे ट्रक सोडण्यासाठी घेतली लाच ..! मग काय तिघांनाही जावे लागले तुरुंगात…कोठे खावे? याचेही राहिले नाही या सरकारी अधिकाऱ्यांना भान..

‏पारनेर : – भष्टाचार रोखण्यासाठी भारतभर ज्या आण्णा हजारे यांनी लढा दिला त्या आदरणीय आन्नांच्याच तालुक्यात काल दि.९ रोजी वन विभागाच्या एकत्रित तीन जनांना नाशिकच्या लाचलुचपत पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे हि लाच जे स्मशानात सरपण लागते ‘त्या’ सरपणाचे ट्रक सोडण्यासाठी माणुसकीची हद्द सोडत पारनेर वनविभागातील या तीन अधिका-यांनी ५० हजाराची लाच मागितली होती त्यापैकी ३० हजाराची लाच स्वीकारली आहे . म्हणजे लाच खोठे खावी याचे भान आणि आदरणीय आण्णांचे भय देखील या सरकारी अधिकाऱ्यांना राहिले नसल्याचे या वरून दिसून येत आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे अहमदनगर ते मुंबई स्मशानासाठी लाकुड पुरवठा करतात  सध्या कोविडचा काळ असल्यामुळे , मुंबईत मयत होणाऱ्यांची संख्या जास्त आहे . तर , मुंबई अति लोकसंख्या असणारे शहर असल्यामुळे तेथे माणसे जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरपण गरजेचे आहे . म्हणून तर पारनेर तालुक्यातील काही वनक्षेत्र परिसरातून मोठ्या प्रमाणावर ही लाकडाची निर्यात मुंबईत केली जाते . पण , दुर्दैव असे की , येथे कोणाला मानुसकी नावाचा प्रकार शिल्लक आहे की नाही देव जाणे. येथील वनपालांनी तर लाच खाण्याच्या देखील हद्दच पार करुन टाकल्या आहेत . चक्क स्मशानातील लाकडांवर त्यांनी लाच खावी . ! म्हणजे लोक माणूस मेला तरी त्याच्या टाळुवरील लोणी चाटायला टपून बसलेले असतात असेच आता बोलले जाऊ लागले आहे . “त्याचे झाले असे की , त्या चार लाकडाचा ट्रक कारवाई करणेसाठी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर येथे विभागीय वन अधिकारी दक्षता नाशिक यांनी जमा केला होता . सदर ट्रक सोडणेसाठी आरोपी १ राजेंद्र जाधव याने ३० हजार रु . लाचेची मागणी केली होती . ती दि . ९ आक्टो २०२० रोजी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर अ.नगर येथे स्विकारली . तर आरोपी २ यांनी रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले व ३ यांनी ५० हजार रू ची मागणी करून त्यापैकी २५ हजार स्विकारल्याचे मान्य केले . याबाबत हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ देखील घेण्यात आलेली आहे . हा सापळा मृदुला नाईक , पोलीस निरीक्षक ला.प्र.वि , नाशिक सह अधिकारी – पोनि . उज्ज्वल पाटील , पोनि . किरण रासकर ला.प्र.वि नाशिक , पोहवा . कुशारे , पोहवा . गोसावी , पो ह वा मोरे , पोना . बाविस्कर , पोना . शिंपी लाप्रवि नाशिक यांनी सुनिल कडासने पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि , नाशिक परिक्षेत्र , नाशिक , सोनवणे अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि , नाशिक परिक्षेत्र , नाशिक , दिनकर पिंगळे पोलीस अधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .

तुषार भाटीया, पारनेर

 

 

About the author

Parner Times

Add Comment

Click here to post a comment

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी