पारनेर फसवणूक

ऐ बाबो…! तारण नसलेल्या जमिनीचा केला लिलाव. जय जवान जय किसान ब्रीदवाक्य असणाऱ्या सैनिक सहकारी बँकेत घोटाळ्यात घोटाळा…!

पारनेर:- जय जवान जय किसान हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पारनेर सैनिक सहकारी बँकेने सुप्याचे तलाठी करपे व मंडल अधिकारी दाते यांना हाताशी धरून तारण न दिलेल्या स्थावर मालमत्तेचे बँकेने बेकायदेशीर लिलाव केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणीची फिर्याद
सुपा येथील सराफ व्यावसायिक पुरुषोत्तम नारायण शहाणे वय 54 यांनी दिली आहे.
याप्रकरणी सुपा येथील तलाठी,मंडळाधिकारी व बँकेचे आजी-माजी चेअरमन सह तेरा जणांविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाऊ राजेंद्र नारायण शहाणे यांनी पारनेर सैनिक सहकारी बँकेकडून व्यवसायासाठी सहा लाखाचे कर्ज घेतले होते थकीत कर्जापोटी त्यांनी 26 लाख ते 30 हजार रुपयांची परतफेड केली असताना देखील ती रक्कम थकित असल्याचे दाखवून व सदर कर्जासाठी तारण नसलेल्या मालमत्तेला बँकेला कुठलाही अधिकार नसताना बँकेने बेकायदेशीर व बोगस रीतीने लिलाव प्रक्रिया राबवून तसेच त्यात हजर नसलेल्या व्यक्तीची खोटी सही करून फसवणूक केल्याप्रकरणी तेरा जणांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने हे करीत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुप्याचे तलाठी करपे मंडळाधिकारी दाते यांसह बँकेचे अध्यक्ष अर्जुन कारभारी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बाजीराव कोरडे, विद्यमान अध्यक्ष शिवाजी तुकाराम व्यवहारे, वसुली अधिकारी प्रवीण नाथा निघुट, व्यवस्थापक आप्पासाहेब बबन थोरात, यांसह अन्य सहा अशा एकूण तेरा जणांचा समावेश आहे..
तुषार भाटीया, पारनेर

About the author

Parner Times

Add Comment

Click here to post a comment

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी