अत्याचार पारनेर

धक्कादायक…! प्रेम करून दोघांनीही केले अत्याचार, ‘त्या’ दोघांविरुद्ध पारनेर पोलिसात गुन्हा दाखल…!

पारनेर:- 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन जणांवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. विशाल नारायण भापकर (वय 29) रा. टाकळी खातगाव, संतोष किसन चितळकर (वय28) रा. भाळवणी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.


पीडित अल्पवयीन मुलगी ही 33 आठवड्यांची गर्भवती असून या पीडितेला नगरच्या स्नेहालयात पाठविण्यात आले आहे. वरील दोन्ही आरोपींना पारनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, एकाने गणपतीच्या सप्ताहात ओळख करून तर दुसऱ्याने शाळेत सोडवायला जाताना ओळखीचा गैरफायदा घेत जवळीक साधून केले अत्याचार.
⇒याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात पीडितेनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भाळवणी येथील 2019 च्या गणेशउत्सवात सप्ताहात मंडप विशाल भापकर याचा असल्याने त्याच्याशी ओळख झाली होती त्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि त्याने पीडितेवर अत्याचार केला. तर संतोष चितळकर याने पीडितेला शाळेत ये- जा करत असताना गाडीवर सोडवताना ओळख करून मोबाईलवर वारंवार संपर्क करून भेटण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेला शारीरिक त्रास झाल्याने दवाखाण्यात नेले असता पीडित अल्पवयीन ही 33 आठवड्यांची गर्भवती असल्याचे समजले त्या नंतर पीडितेच्या आई वडलांनी पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन विशाल भापकर, संतोष चितळकर यांचे विरुद्ध फिर्याद दिली आहे.पोलिसांनी विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा नोंदविला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने हे करीत आहेत……

About the author

Parner Times

Add Comment

Click here to post a comment

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी