पारनेर राजकीय

रणधुमाळी नगरपंचायत पारनेर :; प्रभाग क्रमांक १० मध्ये चुरशीची लढाई !

आगामी काळात होत असलेल्या पारनेर नगर पंचायत निवडणूक प्रभाव क्रमांक १० मधे चुरशीची लढाई पाहण्यास मिळेल असे संकेत उमेदवारांच्या हालचाली वरून लक्षात येतात. हा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने या प्रभागात इच्छुक वाढल्याचे दिसते.

या प्रभागात विद्यमान नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर यांचे पती अर्जुन भालेकर हे रिंगणात असणार आहे याचे संकेत प्रभागातील लोकांकडून मिळतातं.
विद्यमान नगरसेविका यांच्याकडून प्रभागात झालेली विकास कामे जनते समोर ठेऊन आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीस समोरे जाणार असल्याची माहिती भेटती. अर्जुन भालेकर हे शहर विकास आघाडीचे नेतृत्व करत आहेत.

तसेच भालेकर यांचे जवळचे नातेवाईक राजेश चेडे हे याचं प्रभागात वाढदिसानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन करत असल्याचे दिसून येते
राजेश चेडे यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात जिल्हा मराठाचे राहुल झावरे हे उपस्थित राहणार आहेत. या प्रभागात जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नोकरदार वर्ग जास्त प्रमाणात आहे. त्या मुळे राहुल झावरे कोणासाठी विद्या प्रसारक करतात ते पाहावे लागेल.
चेडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येते.

याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून शैलेंद्र औटी है सुद्धा इच्छुक असल्याचे कळते. शैलंद्र औटी यांचा या प्रभागात जनसंपर्क
जास्त असून त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे.
तसेच आमदार निलेश लंके यांच्यापुढे या दोघांमध्ये एकास उमेदवारी देऊन प्रश्न सोडवावा लागेल.

माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी हे शिवसेने कडून या प्रभागात कोणाला रिंगणात उतरवतात हे पाहणे महत्वाचे राहील.

कारण या प्रभागात जिल्हा परिषद बांधकाम सभापती काशिनाथ दाते सर हे राहतात. दाते सरांची भूमिका या प्रभागात महत्त्वाची मानली जाते.
शिवसेनेकडून युवासेना शहर प्रमुख रमिझ राजे हे इच्छुक असल्याचे समजते रमिज राजे हे किमान २ वर्षा पासून या प्रभागात तयारी करत आहेत आणि यांचा युवकांमध्ये जनसंपर्क जास्त प्रमाणावर असून रामिझ राजे यांची हक्काची या प्रभागात दोनशे मते असल्याचे समजते .
येणाऱ्या काळात या प्रभागात जनता कोणाला कौल देते हे विकासाच्या दृष्टीने पाहणे महत्वाचे राहते.

About the author

Parner Times

Add Comment

Click here to post a comment

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी