पारनेर राजकीय

पारनेर नगरपंच्यात महाविकास आघाडी Vs शहरविकास आघाडी ?

रणधुमाळी नगरपंचायत- तोंडावर येऊन ठेपलेल्या पारनेर नगरपांच्यात निवडणूक मध्ये पारनेर शहराचे राजकारण चांगलेच तापले असून अनेक राजकीय बदल घडताना दिसून येत आहेत. महा विकास आघाडी होण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागल्याने भावी नगरसेवकांनी आत्ताच आपापल्या तिकिटाची फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
कोणत्याही क्षणी होत असलेल्या नगरपांच्यात निवडणुकी मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांच्या श्रेष्ठींनकडून नगरपंचायत मध्ये महाविकास आघाडी पॅटर्न राबवला जाऊ शकतो याची दाट शक्यता असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळते आहे.विद्यमान आमदार निलेश लंके हे महाविकास आघाडी साठी आग्रही असल्याचे दिसून येते. तसे झाल्यास माजी नामदार विजय औटी यांचे राजकीय वजन कमी होईल त्यांना पक्षश्रेष्ठींचा आदेश मानावे लागतील आणि सर्व सूत्र विद्यमान आमदार असल्यामुळे निलेश लंके यांच्या हातात राहतील असा युक्तिवाद असल्यामुळे पारनेर नगरपंचायतच्या राजकारणात बदल होण्याची शक्यता आहे.तसेच श्रेष्ठींकडून आदेश महाविकास आघाडीचा आल्यास माजी आमदार विजय औटी हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.कारण पक्षाचे शिस्तप्रिय आमदार आणि नेते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती.म्हणूनच एकनिष्ठपणे काम करतात कि वेगळा पर्याय निवडतात हे पाहणे महत्त्वाचे राहील.त्यांच्यासाठी पुढील राजकारणात दोन पर्याय राहतील महाविकास आघाडीचे काम करावे.किंवा नव्याने स्थापन होत असलेल्या चेडे, भालेकर यांना राजकीय ताकद देउन यांच्या शहर विकास आघाडीला सोबत घेऊन स्वतःचे नगरसेवक निवडून आणून पारनेर शहरावर वर्चस्वव टिकऊन ठेवतात.किंवा पारनेर शहरात एक नवा पर्याय निर्माण करतात हे पहाणे औत्सुक्याचे राहील……

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी