आरोग्य जग

Corona- जगाचा मृतांचा आकडा एक लाखाच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्रात काल सापडलेले कोरोनाचे 229 नवे रुग्ण, हे एका दिवसात आढळलेले सर्वाधिक आहेत. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,364 वर पोहोचला आहे.

जगभराची खबरबात | मृतांचा आकडा एक लाखाच्या उंबरठ्यावर
मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने जगभर घातलेले थैमान कायम आहे. कालच्या दिवसात (9 एप्रिल) 7 हजार 183 रुग्ण दगावले. जगातल्या एकूण मृतांचा आकडा 96 हजारांवर पोहोचला आहे. अमेरिकेत काल 1858 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबई-पुण्यापासून अमेरिका-इटलीपर्यंत ‘कोरोना’ची कुठे काय स्थिती आहे, याचा हा आढावा (Corona Cases in World Update)
जगात काय स्थिती?
-जगभरात काल 7 हजार 183 कोरोना रुग्ण दगावले
-जगातल्या मृतांचा एकूण आकडा 96 हजारांवर
-जगभरात काल तब्बल 84 हजार 215 नवे रुग्ण समोर
-जगभर कोरोनाचे 16 लाखांहून अधिक रुग्ण

अमेरिकेत कोरोनाचे थैमान

-अमेरिकेत कोरोनामुळे काल 1 हजार 858 रुग्णांचा मृत्यू
-अमेरिकेत काल कोरोनाचे 33 हजार नवे रुग्ण समोर
-अमेरिकेत सर्वाधिक 4 लाख 68 हजार रुग्ण
-मंगळवारी 1,971; बुधवारी 1940; तर गुरुवारी 1,858 ‘कोरोना’बळी

युरोपीय देशांमध्ये कोरोनाची स्थिती

-फ्रान्समध्ये मृतांचा आकडा वाढताच
-फ्रान्समध्ये काल एका दिवसात 1341 रुग्ण दगावले
-फ्रान्समध्ये आतापर्यंत 12 हजार 210 रुग्णांचा मृत्यू
-फ्रान्समध्ये एकूण रुग्णसंख्या 1 लाख 18 हजार

-ब्रिटनमध्येही काल 881 ‘कोरोना’बळी
-एकूण मृतांचा आकडा 8 हजारांच्या जवळ
-65 हजार ब्रिटीशांना कोरोनाची लागण

-इटली, स्पेन, जर्मनीत मृतदेहांचा खच
-काल इटलीत 610, स्पेनमध्ये 655 मृत्यू
-जर्मनीत 258 रुग्णांचे कोरोनामुळे प्राण गेले
-स्पेनमध्ये एकूण 1.53 लाख, तर इटलीत 1.43 लाख रुग्ण

(Corona Cases in World Update)

भारतात रुग्ण वाढतेच

-देशभरात काल कोरोनाचे 61 बळी
-देशभरातल्या कोरोनाबळींचा एकूण आकडा 227 वर
-कोरोना रुग्णांची एकूण संख्याही 6 हजार 738 वर
-भारतात काल 781 नवे रुग्ण समोर

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी