निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती समोर आली होती. विधान परिषदेची निवडणूक पुढे गेल्यानं त्यांना राज्यापालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यपालांकडे शिफारस करण्यात आली आहे. यावरून आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी उद्धव ठाकरे हे स्वतःसाठी नशीबवान आहेत. त्यांना सर्वकाही घरबसल्या मिळालं आहे. आता आमदारकीही बसल्या टिकाणी राज्यपालांनी दिली. भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा,” असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. “मुख्यमंत्रीपद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालं, आमदारकी राज्यपालांकडून, पक्ष वडिलांचा, यांचं स्वत:चं असं काहीच नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. त्यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
Add Comment