[ad_1]
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोपी असून त्याला पाठबळ देणाराही मुख्य आरोपी असल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. वाल्मीक कराडला इतके दिवस बाहेर ठेवला, तो षडयंत्र करण्यासाठी ठेवला होता का? असा सवालही जरांगे यांनी केला
.
आरोपींनी त्यांच्या नेत्याचा आधार घेतलेलाच आहे एक लेकरू मारून टाकले आणि माझा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया तो देऊच कसा शकतो? या प्रकरणात मंत्री, आमदार, खासदार आरोपी कोणीही वाचणार नाही. ते सर्व एकमेकांशी बोललेले आहेत, त्यांची कॉल डिटेल असणार, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. एवढी मोठी घटना झाल्यावर आरोपींनी त्यांच्या नेत्याचा आधार घेतलेलाच आहे. या हत्या प्रकरणात सर्वांनी एकमेकांचा आधार घेतलेला आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
…तर मराठे राज्यभर रस्त्यावर दिसतील
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे वाल्मीक कराडवर मोक्का लागला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर संतोष देशमुख यांचे कुटुंब जीवंत आहे. तुम्ही जर दगाफटका केला, तर मराठे राज्यभर रस्त्यावर दिसतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
उज्वल निकमांसारखे मोठमोठे वकील द्यावेत वाल्मीक कराडला आता सोडता कामा नये. इतर आरोपींनाही लवकर धरा. वाल्मीक कराडचा फोन तपासावा. त्याला ज्यांनी-ज्यांनी सांभाळले, त्यांनाही का मदत केली म्हणून जेलमध्ये टाका. दोन-तीन महिन्यांपासून ते आजपर्यंतची सर्व डिटेल्स काढा. यातील एकही माणूस सुटता कामा नये. हे प्रकरण अंडरट्रायल चालले पाहिजे. या प्रकरणात उज्वल निकम यांच्यासारखे मोठमोठे वकील द्यावेत. देशमुख जी मागणी करेल, ती मान्य करा, असे मनोज जरांगे म्हणाले.
[ad_2]
Source link
Leave a Reply