मुख्यमंत्री कोणत्याही गुन्हेगाराला माफ करणार नाहीत: परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला विश्वास – Mumbai News

[ad_1]

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड पोलिसांना शरण गेला आहे. यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरू झाले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घ

.

सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी सभागृहातही बोललोय. जे चांगले आहे ते चांगले आहे. ते स्वीकरतो. पण न्याय होईल की नाही हे सांगायला मी न्यायाधीश नाही. पण आम्हाला अपेक्षा आहे की, ते न्याय करतील. आतासुद्धा जाताना मुख्यमंत्री बोलून गेले की, ते एकालाही सोडणार नाहीत. फक्त माझी मागणी त्यापुढे आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्याबरोबरच परभणीचे स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. तो इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. मोर्चा निघाल्यावरच न्याय मिळणार असेल तर गोष्ट वेगळी आहे, असे आव्हाड म्हणाले.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटलला शेवटचा फोन कुणाचा गेला, हे सर्वांना माहिती आहे. माझ्याच तोंडातून कशाला ऐकता? याआधी देखील बापू अंधारे मर्डर प्रकरण मी आणि जयंत पाटील, आम्ही लावून धरले होते. पण तेव्हा जे एसपी होते ते ऐकत नव्हते. सत्तेमध्ये नसले की काय असते ते आम्ही बघितले आहे. सत्तेत होतो तेव्हा क्राईम घडला नव्हता. मागच्या पाच वर्षात जेवढे खून झाले त्या सर्व खूनांचा तपास करा. मृतकांच्या घरच्यांना बोलवा आणि त्यांना विचारा की, कुणावर तुमचा संशय होता. अनेक जण सांगतील की, कुणावर संशय आहे. माझ्याकडे एका म्हाताऱ्या बाबाचे पत्र आहे की, माझ्या पोराला बुडवून मारले. आम्ही ज्युडीशीयल इन्कावयरी का मागतोय? कारण त्यामध्ये तुम्ही जावून जस्टीसला भेटू शकता आणि सांगू शकता की, माझी अशी तक्रार आहे.

मुख्यमंत्री कोणत्याही गुन्हेगाराला माफ करणार नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मोक्का लागला जाईल, असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी विषयी सांगितले होते. मात्र, आज ते ज्या पद्धतीने बोलले आहेत अपेक्षा आहे की ते त्याच पद्धतीने कारवाई करतील. मुख्यमंत्र्यांकडे मला खूप काही अपेक्षा आहेत. मुख्यमंत्र्यांची 2014 ची भाषणाची स्टाइल ही झुकून बोलायचे. पण आता ते न झुकता उभे राहून बोलतात. त्यांची बॉडी लॅंगवेज बदलली आहे. त्यामुळे कोणत्याही गुन्हेगाराला माफ करतील, असे मला वाटत नाही, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *