शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी: सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी, मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सूचना – Mumbai News

[ad_1]

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो. मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण (D

.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात याव्यात. शासकीय वसतीगृह इमारतींची जिथे आवश्यक असेल तिथे तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी. वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी. तसेच वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी. जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करावी. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे. विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळासाठी एक एस.ओ.पी तयार करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *