अमरावतीत स्कूल कनेक्ट 2.0: उच्च शिक्षणाची जबाबदारी असलेल्या विद्यापीठावर आता शाळांचीही जबाबदारी – Amravati News

[ad_1]

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (एनइपी) शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या तरतुदी आणि त्यानुसार शिक्षक, मुख्याध्यापकांनी अंगीकारावयाची पद्धती समजून सांगण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. ‘स्कुल कनेक्ट २.०

.

एरवी विद्यापीठ हे केवळ उच्च शिक्षणाशी संबंधित घडामोडींकडेच लक्ष पुरविते. परंतु सेवाभाव तसेच शैक्षणिक सहाय्य या परिभाषेनुसार शासनानेच आता विद्यापीठांवर ही जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या परिसरात ज्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत, त्यांना एनइपीबाबत माहिती दिली जाईल. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये संबंधित शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक यांना सहभागी करुन घेतले जाईल. तसे निर्देश कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी संलग्नित सर्व महाविद्यालयांना दिले आहेत.

या कार्यशाळांमधून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालयांना ब‌ळकटी मिळेल. त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवाधिष्ठित, बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रम, मूल्यमापनातील श्रेयांक पध्दती आणि त्यामुळे आलेली लवचिकता, कल्पक, व्यावसायिक आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम याचीही माहिती मिळेल. दहावी-बारावीनंतर आवडीचे अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. शिवाय रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी असलेल्या संधी, पदवी अभ्यासक्रमातील संधी, पदवी स्तरावर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये कॅम्पस टूरचे आयोजन, प्रयोगशाळा, तेथील उपकरणे, विविध भौतिक सुविधा आदी बाबींविषयीही माहिती दिली जाईल.

यासंदर्भात महाविद्यालयांचे प्राचार्य आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी (इयत्ता नववी ते बारावी) आपापसांत संपर्क साधावा, असे आवाहनदेखील कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. संदीप वाघुळे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *