राष्ट्रीय

केंद्राची नियमावली जारी, ट्रेन, विमाने, शाळा बंदच राहणार

नवी दिल्ली: देशात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर केला. यादरम्यानच्या काळात कोणाला सूट मिळणार, काय नियम असणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली केंद्र सरकारने जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, सध्या देशांतर्गत विमानसेवा बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो आणि बससेवाही बंदच राहणार आहेत. या बरोबरच शाळा, कोचिंग अशा शैक्षणिक संस्थाही बंदच राहणार आहेत.

संपूर्ण देशात २० एप्रिलपर्यंत लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान सांगितले होते. त्यानंतर ज्या राज्यांमध्ये हॉटस्पॉट नसतील अशा राज्यांना सूट देण्यात येईल असेही ते म्हणाले होते. याबाबत ही नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

काय बंद राहणार?

केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी