[ad_1]
मुंबई, 27 जुलै : महिला या नवीन नवीन फॅशनेबल कपडे ट्राय करत असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी स्वस्त दरात कपडे मिळत असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते. त्यातच जर महिलांचे कपडे असतील तर प्रश्नच येत नाही. त्या ठिकाणी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते. मुंबईतील मुलुंड मार्केटमधील एका दुकानात चक्क 50 रुपयात लेडीज टॉप्स मिळत आहेत. याबद्दलच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. मुंबईतील मुलुंड मार्केट मधील वाइल्ड शॉप या ठिकाणी महिलांचे विविध प्रकारचे ट्रेण्डी टॉप्स मिळत आहेत. या ठिकाणी मिळणारे टॉप्स आणि टोनिक्स हे अवघ्या 50 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत. हे वाइल्ड शॉप दुकान महिलांच्या कपड्यांचे होलसेल विक्रेते आहे. या वाईल्ड शॉपच्या मालकीण कनिझ फातेमा या गेले सोळा वर्षांपासून या दुकानाचा व्यवहार सांभाळतात.
News18लोकमत
कोणते टॉप्स मिळतात? सध्या फॅशनमध्ये काय सुरू आहे यावर महिलांचे विशेष लक्ष असते. अशातच 50 रुपयात नव नवीन ट्रेण्डी टॉप्स मिळत असेल तर महिला बॅग अगदी गच्च भरेपर्यंत खरेदी करतात. वाइल्ड शॉपमध्ये ट्रेण्डमध्ये असलेले फॅन्सी टॉप्स, ट्युनिक्स, क्रॉप टॉप्स, कोल्ड शोल्डर, ऑफ शोल्डर, वी नेक, बोट नेक असे अनेक प्रकारचे टॉप्स या ठिकाणी फक्त 50 रुपयात उपलब्ध आहेत.
फक्त 150 रुपयात साडी? मुंबईतलं हे मार्केट तुम्हाला माहितीये का? Video
फॅन्सी टॉप्सच नव्हे तर फॉर्मल ऑफिसमध्ये घालण्यासाठी लागणारे डिसेंट फॉर्मल टॉप्स देखील या ठिकाणी 50 रुपयात मिळतील. त्याचबरोबर पार्टीवेअर फ्रॉक आणि वन पीस देखील या ठिकाणी 50 रुपयात मिळतील. आम्ही बंगलोर या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात कपडे आणतो आणि ते या ठिकाणी स्वस्त दरात विकतो. याचा हेतू हा ग्राहकांचे समाधान करणे असा आहे आणि महिलांसाठी ते 50 रुपयात खास पर्याय उपलब्ध करून देत आहोत. 50 रुपयात मिळणाऱ्या या टॉप्ससाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, अशी माहिती कनिझ फातेमा यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link
Leave a Reply