[ad_1]
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीला (आयसीएफ) भेट दिली. यावेळी त्यांनी वंदे भारत रेक, अमृत भारत ट्रेन आणि विस्टाडोम डायनिंग कारच्या डब्यांची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी सांगितले की, ‘अमृत भारत ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. त्याच्या जनरल कोचमध्ये कोणत्याही प्रीमियम ट्रेनप्रमाणेच सुविधा असतील. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘अंत्योदय’ या भावनेतून त्याची उभारणी करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये सीट आणि फॅनचा दर्जा, चार्जिंग पॉईंट आणि रिडिझाइन टॉयलेट अशा अनेक नवीन सुविधा पाहायला मिळतील. वंदे भारत गाड्यांमध्येही सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत.
[ad_2]
Source link
Leave a Reply