​​​​​​​वाल्मिक कराडला कोण वाचवतंय?: व्हिडिओ कॉलवर क्रूर हत्या पाहणारा 8 वा आरोपी मकोका बाहेर कसा? अंजली दमानिया यांचा सवाल – Mumbai News

[ad_1]

संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी आज 7 आरोपींवर मकोकाची कारवाई करण्यात आली. पण त्यातून खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडला बाहेर ठेवण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी तपास यंत्रणांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित

.

वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू आहेत. त्यांना संतोष देशमुख हत्याकांडाशी निगडीत एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बीडच्या सर्वपक्षीय आमदारांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यात आता अंजली दमानिया यांची भर पडली आहे. वाल्मीक कराडला कोण वाचवत आहे? असा खडा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.

संतोष देशमुख यांचा खून 7 जणांनी केल्याचे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. या 7 आरोपींवर मकोका लावला. पण आठवा आरोपी, जो व्हिडिओ कॉलवर अजून मारण्यास सांगत होता, तो कसा सुटला? त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? त्याच्यावर कारवाई करण्याची शासनात हिंमत नाही का? असे अंजली दमानिया या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणाल्या. या प्रकरणी त्यांनी राज्याच्या गृह मंत्रालयावर चांगलेच ताशेरे ओढले.

त्या म्हणाल्या, गतवर्षी मे महिन्यापासून या प्रकरणात आवादा कंपनीकडून सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह इतर आरोपींची नावे येत होती. असे असताना त्याचवेळी कारवाई का करण्यात आली नाही? मे ते डिसेंबर 2024 पर्यंत केवळ टाईमपास करण्यात आला. या प्रकरणी वेळीच कारवाई केली असती तर कदाचित आज संतोष देशमुख जिवंत असते. आज एवढे मोर्चे निघत आहेत. आक्रोश होत आहे. त्यानंतर एका महिन्याने सरकाने लोकांवर उपकार केल्यासारखी मकोकाची कारवाई केली आहे.

वाल्मीक कराड सरकारचा जावई आहे का?

वाल्मीक कराडला सरकारचा जावई असल्यासारखे वागवले जात आहे. वाल्मीक कराडचे सर्वांबरोबर चागंले गणीत आहे. त्याच्यावर धनंजय मुंडे व काही प्रमाणात पंकजा मुंडे यांचा वरदहस्त आहे. या प्रकरणात दबाव असेपर्यंत वाल्मीकवर मकोका लावण्यात येणार नाही, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

हे ही वाचा…

बीड हत्याकांडातील सर्व आरोपींवर मकोका:हत्येच्या प्रकरणात SIT ची कारवाई; धनंजय मुंडेंचे विश्वासू वाल्मीक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा

बीड – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे. टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, विशेष तपास पथकाने या प्रकरणातील सर्वच आरोपींवर हत्येच्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्याची माहिती लवकरच कोर्टाला दिली जाणार आहे. वाचा सविस्तर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *