आरोग्य राष्ट्रीय

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. कोरोना व्हायरसने संक्रमित होण्याचा वेग 40 टक्क्याने कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या आताच्या घडीला 13 हजार 835 आहे. तर, आतापर्यंत 452 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. मागील सात दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग तीन दिवस होता. मात्र, आता त्यात घट होऊन तो 6.1 दिवस झाला आहे.

सुरुवातील प्रत्येक तिसऱ्या दिवशी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. मागील आठवड्यात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा हा वेग कमी झाला असून तो 6.1 दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या जास्त केस आहेत, अशा ठिकाणी पाच लाख अँटीबॉडी टेस्ट किट देण्यात येणार आहे. आणखी सकारात्मक माहिती म्हणजे देशात कोरोनामुक्त होण्याचा वेगही वाढला आहे. आतापर्यंत 13.6 टक्के कोरोना संक्रमित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे. तर, देशात 80 टक्के रुग्ण या कोरोनातून मुक्त होत आहेत. अँटीबॉडी आणि आरएनए वर आधारित वॅक्सीनवर काम सुरू असल्याचही आरोग्य मंत्रालयाने सांगितले. औषधावरही संशोधन सुरू आहे. अद्यापतरी त्यात यश आले नाही. कोरोनावरील संशोधनासाठी आतापर्यंत 319400 टेस्ट घेण्यात आल्या आहेत.

कोरोना चाचणीची संख्या वाढवणार
देशात कोरोनाच्या टेस्ट पुरेशा होत नाहीत, अशी टीका सुरु असतानाच त्याबाबत एक महत्वाची घडामोडी आज घडली. चीनमधून तब्बल साडेसहा लाख टेस्टिंग किट्स भारतात दाखल झाले आहेत. अँटीबॉडी टेस्ट, आरएनए एक्सट्रॅक्शन किट अशा दोन प्रकारचे हे किट आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या 14 हजाराच्या आसपास पोहचली आहे. कोरोनाने 452 बळी देशभरात घेतलेत आणि 135 कोटी लोकसंख्येच्या देशात, कोरोनाच्या आजवर केवळ 2 लाख टेस्ट झालेल्या आहेत. टेस्टची ही संख्या पुरेशी नाही, असा आरोप होत असतानाच चीनमधून साडेसहा लाख टेस्ट किट्स भारतात दाखल झाले आहेत. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट करणारे साडेपाच लाख किट्स आणि 1 लाख आरएनए एक्सट्रॅक्शन किटचा यात समावेश आहे.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी