क्रीडा पारनेर

कोरोना रोगा मुळे ऐतिहासिक पारनेर शहराचा कुस्त्यांचा आखाडा रद्द

प्रत्येक वर्षी महाराष्ट्र दिना निमित्त पारनेर शहरात १ मे रोजी भव्य कुस्त्यांचा आखाडा भरत असतो परंतु या वर्षी जगभरावर ओढवलेल्या कोरोना आजाराचे परिणाम पारनेर शहराच्या आखाड्यावर झालेले दिसले .
पारनेर मध्ये ३२ वर्षापासून चालत आलेल्या आखाड्याला पुणे, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर , नाशिक, औरंगाबाद , जळगाव,सांगली ,सातारा जिल्ह्यातील तसेच हरियाणा, पंजाब, इंदोर, झाशी इथून अनेक नामवंत मल्ल हजेरी लावत असतात..
परंतु या वर्षी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथील निकाली कुस्त्यांचा आखाडा न भरवण्याचा निर्णय पारनेर आखाडा पंच कमिटी यांनी घेतला आहे..तसेच कोरोनाविरुध्द ची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पारनेर मध्ये भव्य कुस्त्यांचे मैदान भरवण्यात येणार असल्याचे पै.युवराज पठारे यांनी सांगितले.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी