अहमदनगर पारनेर व्यवसाय

या व्यवसायाची दुकाने सुरू करण्यास प्रशासनाची परवानगी.

पारनेर:- शहरी आणि ग्रामीण भागातील काही व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा (हॉस्पिटल, मेडिकल, डिझेल पंप डिझेल विक्री २४ तास,
A.T.M) वगळता दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तक्ता स्वरुपात
माहितीही नागरिकांचे माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या बाबींना परवानगी असणार आहे:-
चार चाकी वाहने(अत्यावश्यक सेवा १+२),
दुचाकी वाहने (अत्यावश्यक सेवा गाडीवर१ व्यक्ती), जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा,
बांधकामे (साईटवर कामगार उपलब्ध असणे आवश्यक), एकल दुकाने,
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने,
e कॉमर्सद्वारे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा,
शासकीय आणि खाजगी कार्यालये (३३% कर्मचारी),
कृषी विषयक कामे,
बँका,टपाल, कुरियर सेवा,
तातडीच्या वैद्यकीय कारणासाठी प्रवास,
स्टॅम्प विक्री,सेतू eसेवा केंद्र, आधार केंद्र,
सर्व वाहनाचे गेरेज, पंक्चर ची दुकाने,
वॉशिंग सेंटर, वाहनांचे शोरूम, सुटे भागांचे दुकाने,
बेकरी, मिठाईचे दुकान,
मोबाईल शॉपी,दुरुस्तीची दुकाने,
बांधकाम साहित्य, हार्डवेअर,
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोनिक्स ची दुकाने,
ज्वेलरी, लॉन्ड्रीची दुकाने.
आदी दुकांना परवानगी असणार आहे.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी