महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचा आमदार व्हायचा मार्ग मोकळा; विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार

मुंबई | विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील ही निवडणूक लढणार आहेत. यामुळे ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी महत्वाची ठरणार आहे.

9 जागांसाठी 10 उमेदवार घोषित केल्याने तिढा वाढला होता. यावर काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी उभे राहत असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आग्रही होते. पण काँग्रेस मात्र 2 जागांवर ठाम होती.

काँग्रेस जर दुसरा उमेदवार देत नसेल, तर आपणच निवडणुकीला उभे राहत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी