गुन्हा पारनेर

पारनेर पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी जेरबंद.!

पारनेर:- ग्रामीण रुग्णालयातुन पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला आरोपी मिठू उर्फ प्रविण गायकवाड याला पारनेर पोलिसांनी वडनेर हवेली येथिल एक मंदिरातून पहाटे 4 च्या सुमारास ताब्यात घेतले आहे.
आरोपी प्रवीणने मंगळवारी संध्या 8 च्या सुमारास त्रास होऊ लागल्याचे सांगत पोलिसांना दवाखान्यात घेऊन जाण्यास भाग पाडले होते, त्यादरम्यान त्याने ग्रामीण रुग्णालयातून पोलिसांच्या हाताला झटका देत पलायन केले होते परंतु पारनेर पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पुन्हा पकडले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे पथकातील पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सत्यजित शिंदे ,सुरज कदम, सचिन लोळगे यांनी त्यास जेरबंद केले आहे…..

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी