[ad_1]
अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई, 14 जुलै : शिंदे फडणीस सरकारमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीकरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह एकूण 9 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, दोन आठवडे उलटूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आलं नव्हतं. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेवर मजबूत पकड असलेल्या अजित पवारांनी मात्र एक वेगळीच खेळी खेळत सगळ्यांनाच धक्का दिला. अजित पवारांना अर्थ खात दिलं जाईल अशी चर्चा 2 जुलैपासून सुरू होती. मात्र, अजित पवारांना कोणतेही खातेवाटप करण्याआधीच त्यांनी आज साधारणपणे साडेअकरा वाजता त्यांना मंत्रालयातील विस्तार इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या पाचव्या मजल्यावरील दालनात त्यांनी अर्थ खात्याचे 2 महत्त्वाचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अर्थकार्याचा आढावा घेतला असून अर्थसंकल्पाबाबत अजित पवारांनी या बैठकीत चर्चा केल्याचे बोलले जातंय.
Ajit Pawar : खातेवाटपाआधीच अजितदादांनी घेतली अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक#ajitpawar pic.twitter.com/udWTH5XuYC
— News18Lokmat (@News18lokmat) July 14, 2023
खातं देण्याआधीच अजित पवार यांनी घेतली बैठक? अजित पवारांना कोणतेही खातं देण्याआधीच त्यांनी अशी बैठक कशी काय घेतली? यावरून आता मोठी चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे अर्थ खात्यावरच होकार देत अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळाशिवाय याविषयी त्यांनी भाजपसोबत दिल्लीतदेखील चर्चा केली होती. एकदा नाही तर तीनवेळा अजित पवारांना अर्थ खात देण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली होती, अशी देखील माहिती आता समोर येत आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अर्थ मिळणार यावर अजित पवार ठाम होते. तर गेली दोन दिवस रात्री आणि पहाटेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांमुळे खातेवाटप जवळपास निश्चित करण्यात आले हे स्पष्ट संकेत देत होते. वाचा –
शिंदे सरकारमध्ये पहिल्यांदाच महिला मंत्र्याचा समावेश; कुणी मारली बाजी? बैठकीमुळे नवा वाद? शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री देखील जाहीरपणे खाते वाटप झाले असून काही तासातच यादी जाहीर करण्यात येईल, असं उघडपणे बोलत होते. पण अर्थ खात मिळण्याआधीच अजित पवारांनी अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांशी बैठक कशी काय केली? हा आता वादाचा विषय ठरतोय. तर ही बैठक संपवून अजित पवार त्यांच्या पाचव्या मजल्यावर कार्यालयाच्या बाहेर पडतात प्रसारमाध्यमांना पाहून अजित पवारांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. ज्यावेळेस अजित पवारांना अर्थ खात अधिकृतरित्या जारी करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या मीडिया सेलमार्फत सकाळी साडेअकरा वाजताच्या बैठकीचा व्हिडिओ जारी करून अजित पवारांनी तात्काळ अर्थमंत्री पदाचा पदभार स्वीकारला, अशी माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली.
News18लोकमत
तत्पूर्वी हा अजित पवारांच्या किंवा त्यांच्या कार्यपद्धतीचा एक भाग असल्याचे देखील बोलले जाते. एक क्षण देखील ते आपल्या कार्याचा वाया घालवत नाहीत, असे कौतुक नेहमी अजित पवारांचे केलं जातं. अजित पवारांनी अर्थखातं मिळण्याआधीच अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक जरी घेतली असली तरी या बैठकीत कोणतेही निर्णय घेण्यात आले नाही. फक्त एक साधक-बाधक चर्चा करण्यात आली, असं सांगण्यात येत आहे. अजित पवारांच्या या बैठकीमुळे अजित पवार यांची प्रशासनावरील पकड किती मजबूत आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे देखील बोलले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link
Leave a Reply