पारनेर:- सरपंच हा ग्रामिण विकासाचा केंद्र बिंदू असून केेंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा अभ्यास करून त्या सक्षमपणे राबविल्यास गावामध्ये विकासाची घोडदौड कशी सुरू होते हे वनकुटयाचे सरपंच अॅड. राहुल झावरे यांनी कृतीतून सिद्ध केल्याचे गौरवोद्गार आमदार नीलेश लंके यांनी काढले.
सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असून अदयाप त्यास प्रतिबंध करणारी लस उपलब्ध झालेली नाही. अशा स्थितीमध्ये ग्रामिण भागात काम करणा-या आरोग्य सेविका, अशा सेविका तसेच ग्रामस्थांना रोग प्रतिकारशक्ती वाढविणा-या अर्सनिक अल्बम 30 या गोळयांचे आ. लंके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच अॅड. राहुल झावरे, बापूसाहेब शिर्के, ग्रामसेवक बबनराव थोरात, डॉ. झावरे, सारिका गुंड यांच्यासह आशा सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. लंके म्हणाले, कोरोना महामारीचा सामाना करताना ग्रामपातळीवरील कोरोना सुरक्षा समितीचे अध्यक्षपद सरपंचांकडे आहे. या समितीस कायदयाने अधिकार दिलेले असून कायदयाचा वापर करण्यापेक्षा अॅड. झावरे यांनी जनतेशी संवाद साधत कोरोनाचे गांभीर्य जनतेला समजाउन सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या. त्यामुळेच या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला नसून यापुढील काळतही ग्रामस्थांनी सरपंच झावरे यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षांपासून विविध योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग होत आहे. अशा विविध योजना झावरे यांनी वनकुटयात राबविल्या. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून दुर असलेल्या या गावाचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. सरपंचपदाला किती अधिकार आहेत, हे झावरे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले असून त्यांचे अनुकरण राज्यातील सरपंचांनी केल्यास महाराष्ट्राचा ग्रामिण भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. झावरे व त्यांच्या सहकार्यांनी ग्रामविकासाचे हे काम असेच अविरत सुरू ठेवावे. राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यास मी बांधील आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आपले पालकमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातूनही विकास विकासकामे मार्गी लावण्याची मोठी संधी आहे, त्याचाही लाभ घेण्याचे अवाहन आ. लंके यांनी केले….
‘सरपंच’ ग्रामविकासाचा केंद्रबिंदू आ. निलेश लंके

Add Comment