पारनेर राजकीय

वाढदिवसाचा खर्च टाळून सॅनिटायझर व मास्कचे वाटप…!

पारनेर:- वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शहरातील युवा कार्यकर्ता किरण कोकाटे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वखर्चाने सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे.
या उपक्रमात त्यांना तुषार औटी, स्वप्निल औटी,अक्षय देशमुख, अनिरुद्ध कासार, सचिन धोत्रे, योगेश आढाव, अनिकेत साबळे, या युवकांनी साथ दिली.
या उपक्रमाबद्दल तालुका दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, निवृत्ती वरखडे, अरुण आढाव यांनी कोकाटे यांचे कौतुक केले. कोकाटे यांचा कमी वयापासूनच समाजकारणात सक्रिय सहभाग असून या समाजकार्यात शहरातील तरुण मित्रांची मोठी साथ किरण यांना आहे…..
(तुषार भाटीया, पारनेर)

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी