पारनेर राजकीय

पारनेर मध्ये राजकीय बदल होण्याची चिन्हे ?

पारनेरच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता.
शिवसेनेच्या ताब्यात असलेली पारनेर नगर पंचायत आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाणार असून या नगर पंचायत मध्ये असणारे शिवसेनेचे काही नगरसेवक सध्या राष्ट्रवादीचा वाटेवर असल्याचे दिसून येते. त्यांच्यासोबत माजी ग्रामपंचायत सदस्य हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे गुप्त चर्चा सध्या पारनेर परिसरात आहे.
मागील काळात विधानसभेत शिवसेनेचा झालेला पराभव त्यानंतर विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी हे राजकारणात जास्त सक्रिय होताना दिसत नसल्याच निर्वाळा देत स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही विद्यमान नगरसेवक व माजी ग्रामपंचायत सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची गुप्त बातमी आहे.
आगामी काळात आपल्याला तेच पहावे लागणार आहे की हे नगरसेवक व माजी ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात की नाही किंवा त्यांच्या गरजा पूर्ण होतात आणि ती शिवसेनेतच राहतात.

शुभम देशमुख ,पारनेर

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी