जग

चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय सैनिक हुतात्मा…!

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत भारताचे जवळपास केवळ तीन नाही तर कमीत कमी २० सैनिक हुताात्मा झाल्याची माहिती वृत्तसंस्था एनएनआयनं दिलीय. दुसरीकडे, गलवानच्या या हाणामारीत चीनी सैन्याच्या ४३ जण गंभीर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यातील काहींचा मृत्यू झाल्याची शक्यताही ‘एएनआय’नं वर्तवली आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलाय. गलवान खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय. उंचावरच्या गलवान हाणामारीत १७ गंभीररित्या जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी खाली आणण्यात आलं होतं.

जाहिरात:-

उंचावरच्या ठिकाणाच्या तपमानामुळे जखमींचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण २० भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याचं, अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय.

About the author

Parner Times

Add Comment

Click here to post a comment

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी