महाराष्ट्र राजकीय

…..त्यासाठी मातोश्रीवर जाण्यात कमीपणा काय ?—शरद पवार

वृत्तसंस्था-

पुणे | पारनेरमधील 5 नगरसेवकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र पारनेरचा मुद्दा खूप छोटा आहे, त्याचा राज्यावर काही परिणाम होणार नाही. त्याचसोबत मातोश्रीवर जाण्यात कमी पणा काय? असा सवाल करत शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सडेतोड उत्तर दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यापारी महासंघासोबत बैठक घेऊन विविध प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले, “महाविकास आघाडीत नाराजी नाही. राज्यातील सर्व समस्यांवर आम्ही चर्चा करतो. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतल्यामुळे मला जवळचं ठिकाण म्हणून मी ‘मातोश्री’वर गेलो होतो. मातोश्रीवर गेल्याने मला कमीपणा वाटतं नाही.”

“विरोधकांचं टीका करण्याचं काम आहे आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली कामं दिसत आहेत. सध्या कोरोनामुळे प्राधान्य बदललंय, 14 ते पंधरा तास बैठक होतात. आणि पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणारा प्रश्न नाही,” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी