महाराष्ट्र राजकीय

अखेर ते पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत…

मुंबई: माजी आमदार विजय औटी यांचे नेतृत्व मान्य नसल्याने पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी विद्यमान आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होणार असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच राज्य पातळीवर सेना आणि राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी घडल्या त्याअनुषंगाने आज या पाच नगरसेवकांनी मुंबई येथे जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून पुन्हा घरवापसी करत हातात शिवबंधन बांधले आहे.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी