पारनेर राजकीय

‘राजगृह’ वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पारनेर आर.पी.आय च्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन..!

पारनेर:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुबंई येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पारनेर आर .पी.आय च्या वतीने तालुकाध्यक्ष अमित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवा नेते शिरीष साळवे, अमोल जाधव, अक्षय जाधव, किरण सोनवणे, निखिल गायकवाड, गोपी काळभोर, अजय जगताप, सचिन धोत्रे, संजीवन सोनवणे, विनायक सोनवणे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पारनेर पोलीस स्टेशनला निषेध नोंदविण्यासाठी निवेदन देत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्यात दलीत, बौद्ध समाजावर अत्याचार वाढताहेत लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झालेले आहेत, घरे जाळून टाकण्याचे निषेधार्थ प्रकार घडले आहेत दलित व बौद्ध समाजावर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. दलितांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे तरी दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्यासाठी मागणी या निवेदनात केली आहे………

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी