पारनेर राजकीय

दुधाचे दर घसरल्याने राज्यभर व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभारणार…! शेतकरी नेते अनिल देठे.

पारनेर:- महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून वेगवेगळ्या टप्प्यात लाॅकडाऊन करण्यात आलेले असल्याने त्याचा दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे . राज्यात लाॅकडाऊनपुर्वि दुधाचा खरेदी दर 32 रुपये प्रति लिटर होता मात्र लॉक डाउन झाल्यापासून या दरात कमालीची घसरण होऊन हा दर सतरा ते अठरा रुपयापर्यंत खाली आलेला आहे परंतु विक्रीदरात माञ त्किंचतही घसरण न झाल्याने एका बाजुला शेतकऱ्यांची तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट होत होती. त्यामुळे याबाबत शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना १३ जुलै रोजी पत्र पाठवून राज्यातील दुध दराबाबत ची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत दूधाचा दर प्रतिलिटर ३० रू. करून राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती केली होती.तसेच याबाबत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून दरवाढ न केल्यास १ ऑगस्ट पासुन दुध पुरवठा बंद करण्याचा इशारा देखील दिलेला होता.तथापि राज्य सरकारकडून दूध दरवाढीसंदर्भात कुठलाच निर्णय होत नसल्याचे पाहून शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध शेतकरी व सामाजिक संघटनांच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधत राज्यभर व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभारण्याच्या संदर्भात सातत्याने चर्चा करून सोशल मीडियातून गेली पाच-सहा दिवस मोठ्या प्रमाणात जनजागृती करत दुध दर वाढीच्या आंदोलनाची धार वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.आणि तो प्रयत्न आता यशस्वी होताना दिसत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत दुध उत्पादक शेतकरी व संघटना मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी होत असुन , २१ जुलै पासुन हे आंदोलन अधिक व्यापक स्वरूप धारण करणार असल्याचा विश्वास शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी व्यक्त केला आहे.तसेच त्यांनी या आंदोलनात राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने स्वयंमशिस्त व सामाजिक अंतर ठेवून शांततेच्या मार्गाने हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन केले आहे………

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी