पारनेर राजकीय

शेतकऱ्यांनी दूध बंद आंदोलनाची हाक देताच राज्य सरकारने राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी केले आमंत्रित…!

पारनेर:- दूध दरवाढीसंदर्भात शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतात राज्य सरकारने राज्यातील शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे तालुक्यातील शेतकरी नेते तथा राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल देठे यांचाही समावेश आहे.
ही बैठक 21 जुलै रोजी मुंबई येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. व सहकारी दूध संघामार्फत कमी भावाने दूध खरेदी होत असल्याबाबत चर्चा करण्यासाठी या बैठकीस राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे….(तुषार भाटीया, पारनेर)

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी