गुन्हा पारनेर

मास्क नाही लावले म्हणून त्यांना ठेवले अडीच तास डांबून…

पारनेर:- तुषार भाटीया
मास्क न लावता दुचाकी चारचाकीतुन प्रवास करणाऱ्या पंधरा जणांवर पारनेर पोलिसांनी कलम 188 अन्वये कारवाई केली आहे. या करवाईतील पंधरा जणांना तब्बल अडीच तास पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले होते.
वेळ सायंकाळी साडेसहाची ठिकाण शहरातील डॉ. आंबेडकर चौक, या दिवसांत शहरवासीयांना नेहमीचा वाटणारा सायरेनचा आवाज आज अचानक चौकात येऊन थांबला अन क्षणार्धात पारनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांसह कर्मचाऱ्यांनी मास्क न लावलेल्या दुचाकी, चारचाकी गाड्या अडवायला सुरुवात केली. कारवाई करण्याचा आदेश नगरहून आला होता. अर्थात पोलीस अधीक्षकांचा आदेश म्हटल्यावर कारवाई होणार हे नक्कीच.! पोलिसांनी पंधरा मिनिटांत मास्क न लावलेल्या पंधरा जणांवर कारवाईचा बडगा उगारला पण त्यात झाले असे की, तुम्ही मास्क लावले नाही म्हणून तुम्हाला पोलीस ठाण्यात न्यायचे आणि त्याठिकाणी एक कागदावर समज देऊन तुम्हाला सोडवून देणार आहोत. आता खाकीपुढे नको म्हणायची हिम्मत कोणाची? मग काय एरव्ही सोशल डिस्टसिंगचे पालन करायला सांगणाऱ्या पोलिसांनीच नियम पायदळी तुडवत एका पोलिसांसाठी अधिग्रहित केलेल्या शासकीय वाहनातुन अकरा जणांना डांबून पोलीस ठाण्यात नेले.
त्या ठिकाणी नेल्या नंतर या 11+4 पंधरा जणांशी जणू एखादा मोठा गुन्हा करून आले की काय? अश्या थर्ड डिग्री भाषेत बोलायला सुरुवात केली यामध्ये तीन महिलांचाही समावेश होता. तरी देखील समोर ऐकू जाणाऱ्या महिलांचा विचारही न करता या ‘दादां’ची भाषा तशीच सुरू होती . आणि विशेष हे होते की, या पंधरा जणांनी मास्क न लावले म्हणून यांचेवर कारवाईचे सोपस्कार पूर्ण करणाऱ्याच एका जबाबदार कर्मचाऱ्याने मास्क लावले नव्हते हे विशेष.!
दोन तास वाट पाहून या पंधरा जणांतील काहींनी आमदार निलेश लंके यांचेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. आमदार लंके यांनी तात्काळ दोन कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात पाठवून दिले. या कार्यकर्त्यांच्या पाहण्यात वरील सर्व घटनाक्रम आला मग त्यांनीही लवकर कायदेशीर बाबींची पूर्तता करून यांना लवकर सोडा कारण कारवाई करणाऱ्या एका कुटुंबात एक लहानग्याचाही समावेश होता.
हा सगळा प्रकार तब्बल अडीच तास सुरू होता. या पंधरा जनांतील कोणाला या अडीच तासात तहान लागत होती तर कोणाला लघु शंका पण काय करणार? नाव गाव विचारताना अशे विचारत होते की जणू काय एखाद्या विशेष गुन्ह्यातील हेच ‘ते’ आरोपी. त्यामुळे जाऊन येऊ का? अशी विचारायची हिम्मतच कोणाची झाली नाही. शेवटी अडीच तासानंतरच यांना सोडून देण्यात आले….

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी