पारनेर:- शहरातील आणि परिसरातील कोरोना बधितांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेता पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे,नगरपंचायत चे नगरसेवक यांनी शहरातील सर्व दुकाने दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.बुधवार दि. 5, गुरुवार दि. 6 शहरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
शुक्रवारी दि.7 सकाळी दुकाने सुरू करताना व्यावसायिकांनी दुकाने सॅनिटायझेशन करणे तसेच ग्राहकांसाठी दुकानाबाहेर ऑइलपेंट ने सोशलडिस्टनसिंग नुसार चौकोन तयार करणे, पुरेश्या प्रमाणत दुकानाबाहेर हात धुण्यासाठी पाणी , साबण यांची व्यवस्था करणे बंधनकारक राहील. दुकाने सकाकी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेतच सुरू ठेवता येणार आहेत.व्यापाऱ्यांकडून नियनांचे पालन न झाल्यास तात्काळ दुकान एक महिन्यांसाठी सील केले जाणार असल्याचे तहसिलदार देवरे यांनी सांगितले आहे…..(तुषार भाटीया, पारनेर)
पारनेर शहर दोन दिवसांसाठी बंद…!

Add Comment