पारनेर राजकीय

सावरगाव व पळसपूर येथील विविध विकासकामांचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते भूमिपूजन….!

पारनेर:- तालुक्यातील सावरगाव व पळसपुर येथील 55 लक्ष निधी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी विभागाचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये सावरगाव येथील लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत 222 ते काळेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 25 लक्ष, सन 2019-20 रस्ते दुरुस्ती अंतर्गत गोडसेवाडी मानेवाडी लांडगेवाडी रस्त्यावर सी.डी करणे रुपये ५ लक्ष ,सावरगाव येथील इंदिरा कॉलनी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे रुपये ५ लक्ष पळसपुर ते डोंगरवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रुपये २० लक्ष रुपये आदी कामांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, बाजार समितीचे संचालक शिवाजी बेलकर, अशोक कटारिया, सावरगाव चे सरपंच भाऊ चिकणे, पळसपुर चे सरपंच माधव पवार , काटाळवेढाचे सरपंच सुदाम गाजरे ,उपसरपंच ठका कडुसकर, शिवसेना महिला ता.उपप्रमुख सुनिता आहेर, सचिन गोडसे, देवराम मगर, उद्योजक बाबाजी लांडगे, रामदास ढोले, रवींद्र गायके, आनंदा लांडगे ,म्हातारा गायखे, नारायण गायके, जालिंदर गायके, नवनाथ राळे, गोरक्षनाथ बेलकर, लहू गोडसे, नाथा लांडगे , खंडू भाईक, सावळेराम डोंगरे ,भाऊ नाना आहेर, शिवाजी शेठ आहेर, राजेंद्र डोंगरे ,सुभाष डोंगरे, संभाजी डोंगरे,बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जाधव, महांडुळे, ग्रामसेवक भालेकर ,कामाचे ठेकेदार फारुक सय्यद, बबन वाळुंज ,अनिल तांबडे, सह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी बेलकर यांनी केले. तर आभार पळसपुर चे सरपंच माधव पवार यांनी मानले……….(तुषार भाटीया, पारनेर)

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी