पारनेर राजकीय

टाकळी ढोकेश्वर गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वर्गखोल्यांचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते भूमिपूजन….!

पारनेर:- टाकळी ढोकेश्वर गटामधिल अनेक गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्या जुन्या झालेल्या आहेत. त्याठिकाणी नवीन शाळाखोल्या देणे क्रमप्राप्त आहे. म्हणून सन २०१९-२० मध्ये उपलब्ध निधीतून टाकळी गटातील २६.२५ लक्ष निधी काही वर्गखोल्यासाठी मंजूर करण्यात आला असून उर्वरित वर्ग खोल्यांना देखील लवकरच शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिले.
२६.२५ लक्ष निधी असलेल्या टाकळी ढोकेश्वर गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वर्गखोल्यांचे भूमिपूजन सभापती दाते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते…..
यामध्ये डोंगरवाडी, भोरवाडी, पवळदरा येथील या प्रत्येकी रुपये ८.७५ लक्ष इतका निधी असलेल्या नवीन वर्गखोली इमारत बांधकाम करणे अशा कामांचा समावेश आहे. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच संभाजी डोंगरे, पोखरी चे सरपंच सोपान फडतारे, तुळशीराम शेलार,अण्णा पवार,कुंडलिक वाकळे, सतीश पवार,राजू डोंगरे, शिवाजी डोंगरे, सुदाम गाजरे, म्हसोबा झापचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर,तुकाराम दरेकर, उपसरपंच अंकुश काशिद, भाऊ हांडे ,लक्ष्मण हांडे, संतोष हांडे ,उद्योजक जयराम आहेर, जयसिंग आग्रे ,बारकू कडूसकर, शिवाजी गगे, सुभाष डोंगरे, बबन गाजरे, धोंडिभाऊ डोंगरे, पाचपुते सर, कैलास डोंगरे,नाथा डोंगरे, मथु डोंगरे, नवनाथ डोंगरे, निलेश डोंगरे, बबन कडुसकर, नाना डोंगरे, विकास डोंगरे, विश्वनाथ डोंगरे, सोपान डोंगरे, शांताराम डोंगरे, साहेबराव खंडागळे ,ग्रा.पं सदस्य सिताराम केदार, धोंडीभाऊ मधे, पांडुरंग आहेर ,गोरख फडतारे, सूर्यभान फडतारे ,शुभम पवार, राजू आतार ,सचिन पवार ,सुनील खैरे ,हरी शिंदे, नानाभाऊ मधे, पोपट वाघ ,वाळुंज गुरुजी, गाढवे गुरुजी, निवडूंगे गुरुजी ,ठाणगे गुरुजी ,मंचरे गुरुजी ,कामाचे ठेकेदार अनिल तांबडे, बबन वाळुंज, कनिष्ठ अभियंता महांडुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठकाराम कडुसकर यांनी केले तर म्हसोबाझापचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर यांनी आभार मानले…….(तुषार भाटीया, पारनेर)

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी