आरोग्य पारनेर

पारनेर शहर उद्यापासून तीन दिवसांसाठी बंद…. तहसिलदार ज्योती देवरे यांचे आदेश..!

पारनेर:- शहरातील सर्व व्यवहार उद्यापासून दि.27,28,29 या तीन दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.

गेल्या आठ दिवसांत शहरातील चार जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी शहरातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. अनेक जण उपचार घेऊन सुखरूप घरी परतले असले तरी मागील आठ दिवसांत शहरातील चार जणांनी जीव गमवल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.त्यामुळे पारनेर शहर काही दिवसांसाठी बंद ठेवण्याच्या मागणीने व्यापारी वर्गातूनच जोर धरला होता.त्यानुसार पारनेरच्या तहसिलदार देवरे यांनी शहर तीन दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिला आहे.

नागरिकास कसल्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास तात्काळ त्यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील देवरे यांनी केले आहे…..(तुषार भाटीया, पारनेर)

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी