पारनेर

करंदी गावावर शोककळा.! चार तरुणांचा अपघाती मृत्यू….

पारनेर:- मुंबई येथे भाजीपाला विक्री करून परतत असताना करंदी येथील चार शेतकरी तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना सकाळी सहाच्या सुमारास आळेफाटा जवळील वडगाव आनंद येथे घडली आहे.
या अपघातात करंदी येथील सुरेश नारायण करंदीकर(उघडे), सिद्धार्थ राजेश करंदीकर(उघडे), आकाश सुरेश रोकडे, सुनिल विलास उघडे यांचा मृत्यू झाला आहे. मयत सुरेश, सुनिल, आकाश, सिध्दार्थ
करंदी येथील हे चार तरुण काल दि.27 रोजी महिंद्रा जितो या मालवाहतूक वाहनाने मुंबई येथे भाजीपाला घेऊन गेले होते. भाजीपाला विक्री करून आज सकाळी परतत असताना आळेफाटा जवळील वडगाव आनंद येथे समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. धडक समोरासमोर इतकी जोराची होती की, अक्षरशः महिंद्रा जितो मधून मृतदेह बाहेर काढता येत नव्हते. पुढे असणाऱ्या चालकासह दोन आणि मागे झोपलेल्या अवस्थेतील दोघांचा अशा या चार शेतकरी तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंदीकर, यांसह शशिकांत करंदीकर, सुरेश रोकडे, रविंद्र रोकडे, विलास उघडे, रोहित उघडे, निलेश खोमणे, प्रकाश उघडे, सागर करंदीकर, सनी उघडे, जितेंद्र उघडे, यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेने करंदी गावसह पारनेर तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे……(तुषार भाटीया, पारनेर)

About the author

Parner Times

Add Comment

Click here to post a comment

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी