[ad_1]
31 आक्टोबर हा दिवंगत उपपंतप्रधान व देशाचे पाहिले गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘जयंती दिन’ व देशाची एकता व अखंडतेप्रती बलीदान देणाऱ्या स्व. इंदीरा गांधी यांचा ‘स्मृती दिन’ हा राष्ट्रीय संकल्प दिन साजरा केला जात आहे. मात्र, देशाच्या अखंडतेसाठी
.
तसेच सदरचा स्मृतीदिन ‘राष्ट्रीय संकल्प दिन’ म्हणून मुळात साजरा होत असतांना, हाती असलेल्या सत्तेच्या आधारे ३१ आक्टो हा दिवस नव्याने ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात येत आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी दिवंगत पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या प्रती सरकारतर्फे आदरांजली न वाहणे व जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणे हे मोदी सरकारच्या राजकीय असुयेचे प्रदर्शन असल्याची आक्रमक टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. मोदी सरकारचा महीला नेतृत्वा विषयी दुजाभाव व असुया देखील स्पष्ट होत असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, देशाचे पहीले (उप-पंतप्रधान) गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी महात्मा गांधींच्या हत्ये नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची भुमिका धेतली व तसे प्रयत्न केले. ही सत्य वास्तविकता असतांना मात्र, मोदी सरकार व भाजप त्यांची जयंती देशभर साजरी करते. मात्र लोकशाही मुल्यांची व स्वातंत्र्याची जोपासना करणाऱ्या व स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी असणाऱ्या ज्या पंडीत नेहरूंनी ते मान्य केले नाही.त्यांचे विषयी व नेहरू – गांधी कुटुंबियां विषयी मात्र सतत द्वेष, असुया व्यक्त करते.
ही देशाच्या सत्य – वास्तववादी ईतिहासाशी प्रतारणा आहे. ईतीहासाचे दिशाभूल करणारे असत्य प्रदर्शन हा लोकशाहीवादी प्रजासत्ताक राष्ट्राकरीता एक प्रकारे राष्ट्रद्रोह आहे. इंदीरा गांधी यांचा अवमान करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नां बद्दल तीव्र खेद व्यक्त करून निषेध करत असल्याचे ही त्यांनी भावना व्यक्त केली आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply