मुलीस सेलिब्रेटी बनवण्याचे आमिष: महिलेने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटली – Pune News

[ad_1]

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करून तिला एका महिलेने तुला सेलिब्रिटी बनवते असे म्हणत तिचा विश्वास संपादन केला. मात्र, त्याकरीता सदर मुलीच्या घरात ठेवलेले सोन्याचे दागिने ,रोख रक्कम आणण्यास भाग पाडून तीन लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देम

.

याबाबत ललिता गोविंद घोटाळे (वय -43 ,राहणार – मांजरी, पुणे )यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी हीच्याशी आरोपी महिला ज्योती खंकाळ हीने ओळख निर्माण केली. तिला सेलिब्रिटी बनवण्याचे आमिष तिने दाखवले परंतु त्याकरीता मुलीच्या घरात ठेवलेले रोख एक लाख 70 हजार रुपये व 12 ग्रॅम वजनाचे सोने तसेच एटीएम कार्ड वरून 32 हजार रुपये रक्कम महिलेने काढून घेतली .तसेच तिच्या वडिलांच्या नावावर असलेल्या बँक कार्डचा वापर करून वेळोवेळी 55 हजार रुपये मुलीच क्यूआर कोड मार्फत व पाच हजार रुपये रोख असे दोन लाख 62 हजार रुपये रोख व साठ हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे .याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले पुढील तपास करत आहे.

ऑनलाइन पावणेतीन लाखांचा गंडा

कोथरूड येथे राहणाऱ्या गणेश नामदेव रामदास (वय 44 )यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून तुमच्या क्रेडिट कार्डवरील एनुअल चार्जेसचा ऑप्शन बंद करण्याचा बहाणा केला. त्यांना एक ॲप इन्स्टॉल करण्यास सांगून त्याद्वारे बँकेची गोपनीय माहिती घेऊन ,दोन लाख 72 हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे .अशाच प्रकारे वारजे येथे राहणाऱ्या मनोहर खवले (वय -62 )यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून महाराष्ट्र गॅस निगम लिमिटेड मध्ये पैसे भरण्याच्या बहाण्याने गैरप्रकार झाल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्यांची एकूण अडीच लाख रुपये इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत वारजे पोलीस पुढील तपास करत आहे .

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *