अहमदनगर व्यवसाय

आता 5 ऐवजी 7 वाजेपर्यंत दुकाने राहणार सुरू…!हॉटेल, लॉजसह राज्यभर विनापास प्रवास

जिल्हा अपडेट:- नगर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सरकारच्या सुचनेनुसार आज 1 सप्टेंबर 2020 रोजी एक महत्वाचा आदेश काढला आहे . त्यामुळे नागरिक, व्यापारी, उद्योग व्यवसायीक यांना समाधान लाभले आहे. कारण, सर्व दुकाने पुर्वी 5 वाजता बंद होत होते . तर तो नियम शिथिल करुन ती मर्यादा 7 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. इतकेच काय . ! तर हॉटेल्स आणि लॉज देखील काही नियम अटी राखून खुली करण्यात आलेले आहेत . तसेच खाजगी बस , मिनी बस व अन्य वाहतून यांना आता परवानगी राहणार आहे . त्याच बरोबर आता राज्यात संचार करण्यासाठी कोणत्याही पासची गरज लागणार नाही . . अर्थात ही सर्व सुविधा आजपासून नाही तर उद्या बुधवार दि . 2 सप्टेंबर पासून लागू करण्यार येणार आहे. त्यामुळे , प्रत्येकासाठी ही एक प्रकारची गुडन्युज आहे . मात्र , आनंदाच्या भरात कोणी कोरोनाच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष देखील करु नये . त्यासाठी देखील काही सुचना करण्यात आलेल्या आहेत.
गेल्या सात महिन्यापासून देशाला कोरोनाचे ग्रहण लागले होते . त्यानंतर महाराष्ट्र राज्य देखील पुर्णत : थांबले होते . आता मात्र , त्यास चालना मिळू लागली आहे . कारण , आता राज्य सरकारने काही नियम व अटी शिथिल करण्याचे काम सुरू केले आहे . कारण , यापुर्वी सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालु राहत होते . आता मात्र , दोन तास दुकाने उशिरापर्यंत चालु राहणार आहेत . म्हणजे 7 वाजेपर्यंत व्यावसायिकांना धंदा करता येणार आहे . तसेच गेली सहा महिने लॉज आणि हॉटेल सुरू होते . आता मात्र , त्यांच्यावरील बंदी हटली आहे . विशेषत : संचारबंदी , पर्यटन , जिल्हाबंदी असल्यामुळे लॉजचे बजेट घसरले होते . मात्र , हॉटेल चालकांना मोठा फटका बसला होते . त्यानंतर दोन महिन्यापुर्वी पार्सलच्या नावाखाली हॉटेल चालु झाले खरे . मात्र , पार्सलपेक्षा भल्याभल्या पाटा हॉटेलांमध्ये होत होत्या . आता त्यांना कोणाची भिती राहीली नाही .


 ” या व्यतिरिक्त तालुक्यात बाजारपेठा सकाळी 9 ते 7 चालु राहतील , तसेच सरकारी कार्यालयात गट अ , गट ब अधिकारी शंभर टक्के उपस्थित राहतील , तर गट अ , गट ब व्यतिरिक्त 50 टक्के क्षमतेने किंवा 50 पेक्षा कमी क्षमतेने कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील . तर येणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एका दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे . तर येणाऱ्या जाणाऱ्यांचे टेम्प्रेचर घेणे , हॉड वॉश , सॅनिटायझर देणे , मास्क तपासणे बंधनकारक राहिल . तसेच खाजगी कार्यालयात 30 टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतात . त्यानी देखील अशाच प्रकारची काळजी घ्यायची आहे . तसेच आता अंतजिल्हा हलचालींवर कोणतेही बंधन राहणार नाही . कोणाकडून ई पासची मागणी करण्यात येणार नाही . खजगी बस , मिनीबस , आरटीओ प्रमाणीत गाड्या देखील आता काही नियम व अटी राखून सुरू करण्यात आलेल्या आहेत . तर ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे , ज्या महिला गरोदर आहेत , ज्यांचे वय 10 पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींनी घरी राहण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

जाहिरात:-
तर ज्या अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी ठिकाणे बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यात शाळा , महाविद्यालये , शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था , सिनेमा हॉल , जलतरण , मनोरंजन पार्क , थिएटर , मॉल मार्केट ( कॉम्प्लेक्समध्ये असलेले देखील ) , पेक्षागृह , असॅम्बली हॉल , हवाई प्रवासी वाहतूक , अंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक , सर्व प्रकारचे सामाजिक , राजकीय , क्रिडा , मनोरंजन , अकॅडमिक , सांस्कृतीक , धार्मिक कार्यक्रम प्रार्थनास्थळे , धार्मिक स्थळे 30 सप्टेंबर पर्यंत तथा पुढील अदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत …..
तुषार भाटीया.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी