पारनेर

तालुका पत्रकार संघाच्या पुढाकाराने तालुक्यातील पत्रकारांना पल्स ऑक्सिमिटर चे वितरण…!

पारनेर:- तालुका पत्रकार संघाच्या पुढाकाराने तालुक्यातील पत्रकारांना रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पल्स ऑक्सिमिटरचे वितरण करण्यात आले. शहरातील बाजार समितीतील सभागृहात अहमदनगर जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, कान्हूर पठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे, पारनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी गवळी, भोसले, कान्हूर पठारचे दिलीप ठुबे, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाचे अध्यक्ष शरद झावरे, उपाध्यक्ष सनी सोनावळे, सचिव उदय शेरकर, खजिनदार विनोद गोळे, प्रसिद्धी प्रमुख दादा भालेकर, दत्ता उनवने, कार्यकारणी सदस्य शशिकांत भालेकर, किरण शिंदे, कानिफनाथ गायकवाड, अर्जुन बढे, सुरेंद्र शिंदे, शरद रसाळ, भास्कर पोपळघट, सतिष ठुबे, तुषार भाटिया, श्रीकांत चौरे, देवा उंडे, केशव चेमटे, संपत कपाळे, श्रीकांत ठुबे, सुभाष दिवटे, भिकाजी धुमाळ, लतीफ राजे, मंगेश पारखे, प्रमोद गोळे सह तालुक्‍यातील पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव उदय शेरकर तर सुत्रसंचालन शरद झावरे व आभार विनोद गोळे यांनी मानले आहे……

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी