[ad_1]
Causes Of Brain Stroke : विविध मुद्द्यांवर आधारित अनेक अहवाल आजवर लँसेटनं प्रसिद्ध केले असून, या अहवालांच्या आधारे अतिशय महत्त्वपूर्ण संदर्भ वेळोवेळी समोर आले आहेत. याच दरम्यान एक असा निरीक्षणपर अहवाल सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये वायू प्रदूषण आणि ब्रेन स्ट्रोक यासंदर्भातील धास्तावणारी माहिती समोर आली. या निरीक्षणातून उघड झालेल्या माहितीनुसार वायू प्रदूषणाचा परिणाम धुम्रपानासमानच असून, हेच ब्रेन स्ट्रोकचं मुख्य कारण ठरत आहे.
भारत, अमेरिका, न्यूझीलंड, ब्राझील आणि युएईमधील वैज्ञानिकांनी सहभाग घेतला असून, या आकडेवारीनुसार हवेतील लहान पण स्थायू स्वरुपातील आणि वजनानं हलके असणारे कण वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात. इतकंच नव्हे, तर यामुळं स्ट्रोकचा धोकाही वाढतो. अहवालातून मिळालेल्या निष्कर्षांनुसार मागील तीन दशकांपासून स्ट्रोक अर्थात पक्षाघाताच्या घटनांमध्ये आणि त्यामुळं होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यांमध्ये कमाल वाढ झाली आहे.
2021 मध्ये स्ट्रोकमुळं प्रभाविक झालेल्यांचा आकडा 1 कोटींहून अधिक होता. 1990 नंतरपासून या आकडेवारीमध्ये साधारण 70 टक्के वाढ झाली. तर, स्ट्रोकमुळं मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आकडेवारी 70 लाखांवर पोहोचली असून, यामध्ये 44 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
ब्रेन स्ट्रोकला कारणीभूत घटक कोणते?
अध्ययनातून समोर आलेल्या माहितीनुसार बहुतांश घटक स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरले. ज्यामध्ये उच्च रक्तदाब, धुम्रपान, हाय कोलेस्ट्रॉल, घरगुती वायू प्रदूषण आणि पर्टिक्युलेट मॅटर वायू प्रदूषण यामुळं स्ट्रोकचा धोका अधिक बळावत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. असं असलं तरीही हा धोका कमी करता येऊ शकतो आणि त्याची शक्यता ही 84 टक्के असल्याचं मत वॉशिंग्टन विश्वविद्यालयातील डॉ. कॅथरीन ओ. जॉनसन यांनी मांडलं.
सार्वजनिक स्तरावर वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्वच्छ वायू क्षेत्र आणि धुम्रपान प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करत स्थूलता आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर वर लक्ष केंद्रीत केलं जाण्याची गरज जॉनसन यांनी व्यक्त केली.
[ad_2]
Source link
Leave a Reply