[ad_1]
कल्याण (kalyan) -डोंबिवली (dombivli) शहरांच्या विविध भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. संध्याकाळी सात वाजल्यापासून ते पहाटेपर्यंत डासांचा उपद्रव होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
डासांचे थवेच्या थवे संध्याकाळच्या वेळेत घरात घुसतात. रस्त्यावर उभे राहिले तरी चारही बाजुने डास हल्ला करतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
उघडी गटारे, नाले भागात डासांचे (mosquitoes) प्रमाण अधिक आहे. शहराच्या विविध भागात इमारत उभारणीची कामे सुरू आहेत. या बांधकामाच्या ठिकाणी पाणी साठवणीसाठी उघड्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणीही डासांचा उपद्रव अधिक आहे.
चाळी, झोपडपट्टी भागात डासांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या डासांचा बंदोबस्त करण्यासाठी यापूर्वी दर महिना, पंधरा दिवसांनी प्रत्येक प्रभागात सकाळच्या वेळेत मिनी ट्रॅक्टरव्दारे, संध्याकाळच्या वेळेत जीपच्या माध्यमातून पालिकेकडून धूर फवारणी केली जात होती.
पाठीवर पंप घेऊन पालिका कामगार चाळी, झोपडपट्ट्या, इमारतींंमध्ये जाऊन डास प्रतिबंधक फवारणी करायचे. हे प्रकार अलीकडे कमी झाले आहेत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
दोन दोन महिने पालिकेची फवारणीची यंत्रणा फिरकत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच डासांचे प्रमाण वाढल्याचे नागरिक सांगतात. डासांचे प्रमाण वाढवुनही पालिकेकडून नियमित धूर फवारणी केली जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा
[ad_2]
Source link
Leave a Reply