घराणेशाहीतून उभ्या राहिलेल्या 237 उमेदवारांपैकी फक्त 89 झाले आमदार: विधानसभेला 5 वडील-मुले, 6 काका-पुतणे अन् 13 भावंडे मैदानात – Chhatrapati Sambhajinagar News

[ad_1]


राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात २३७ उमेदवार कोणत्या ना कोणत्या राजकीय घराणेशाहीशी संबंधित होते. यात ५ मतदारसंघात वडील-मुले, ६ ठिकाणी काका-पुतणे, तर १३ ठिकाणी भाऊ-बहीण-भाऊ यांच्यात लढत होती. सर्वाधिक ४५% घराणेशाहीचे उमेदवार राष्ट्रवादी (शप) तर ४४% अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होते. उद्धवसेनेत सर्वात कमी २०% उमेदवारांनाच राजकीय पार्श्वभूमी होती. मतदारांनी केवळ ८९ उमेदवारांच्या गळ्यातच विजयाची माळ घातली. शिक्षक हेरंब कुलकर्णी यांच्या अभ्यासातून समाेर आलेे. उमेदवार देताना त्यांची निवडून येण्याची क्षमता हा पहिला निकष ठेवला जातो. त्यादृष्टीने स्वत:ची यंत्रणा, संस्थात्मक जाळे, कर्मचारी व दीर्घकाळ सत्ता असणारे उमेदवार या निकषात बसतात. अशा उमेदवारांना निवडणूक लढण्याचा अभ्यास असतो. कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित निवडणुका महागल्याने सामान्य कार्यकर्त्याला त्या लढणे कठीण जाते. यामुळे घराणेशाहीला चालना मिळते. यामुळे सत्तेचे केंद्रीकरण एकाच घराण्यात राहते. कार्यकर्ता आयुष्यभर कार्यकर्ताच राहतो. त्याच्या मुलाच्या वयाचे उमेदवार एका रात्रीतून नेते होतात. याविरुद्ध तक्रार करण्याचीही सोय नसते. घराणेशाहीचे दुष्टचक्र मोडण्याची गरज आहे. -हेरंब कुलकर्णी, शिक्षक व राजकीय अभ्यासक
राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघात २ घराणे, १० ठिकाणी ३, एका ठिकाणी ४, तर १७५ मतदारसंघात प्रत्येकी १ घराणेशाही असणारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पैकी ८९ विजयी, तर १५१ पराभूत झाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *