[ad_1]
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानजोती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी २०१
.
या निमित्ताने फुले दांपत्याच्या या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्याच्या मागणीला मिळालेले यश साजरे करण्यासाठी माळी महासंघातर्फे बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता दगडुशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) अशी भव्य फुले दांपत्य सन्मान आणि विजय एकता महारॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती माळी महासंघाचे पुणे शहराध्यक्ष दीपक जगताप यांनी दिली आहे.
दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा येथून या रॅलीला प्रारंभ होणार असून पुढे शिवाजी रोड मार्गे फडगेट पोलीस चौकी येथून डाव्या बाजूने गंजपेठ पोलीस चौकी आणि महाराणा प्रताप रोडने गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा अर्थात समता भूमी येथे येऊन सर्व फुले प्रेमी फुले दांपत्याला अभिवादन करणार आहेत. या महारॅलीचा समारोप सावित्रीबाई फुले स्मारक येथे होईल. या महारॅलीला महाराष्ट्रातून हजारो फुलेप्रेमी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या रॅलीव्दारे फुले दांपत्याचा जीवन प्रवास उलगडण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित भव्य दिव्य अशा स्वरूपात चित्ररथाची मांडणी करण्यात येणार आहे. ढोल-ताशा आणि लेझीम पथके, शंखनाद, आकर्षक फुलांची सजावट करून रॅली मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्यात येणार आहेत. या रॅलीमध्ये झेंडे आणि फलक घेऊन फुले प्रेमी सहभागी होणार आहेत.
[ad_2]
Source link
Leave a Reply