[ad_1]
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ‘द वल्चर अँड द लिटील गर्ल’ या नाटकाला मिळाले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विधीषण चवरे यांनी आज, मंगळवारी हा निकाल घोषित केला. या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक होमीसाईड या नाटक
.
सिपना महाविद्यालयाच्या अरविंद लिमये सभागृहात १३ ते २६ डिसेंबरदरम्यान अमरावतीची नाट्यस्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण १४ नाटके सादर झाली. ‘द वल्चर अँड द लिटील गर्ल’ हे नाटक पंचशील बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेने सादर केले होते. तर होमीसाईडचे सादरीकरण अंबापेठ क्लबने आणि थलाई कुत्थलचे गंधर्व बहुद्देशीय संस्थेने केले होते. नाटकाच्या विजयासोबतच या नाट्य संस्थांच्याही लौकीकात भर पडली आहे.
दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक ‘द वल्चर अँड द लिटील गर्ल’ या नाटकासाठी राहुल वासनकर यांना देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक सचिन गोटे (नाटक – होमीसाईड) यांनी पटकावला. परीक्षकांच्या नजरेतून थलाई कुत्थल या नाटकाची प्रकाशयोजना अगदी उत्कृष्ट होती. त्यामुळे ती साकारणाऱ्या दीपक नांदगावकर यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय पारितोषिक अमोल आढाव (नाटक – ‘द वल्चर अँड द लिटील गर्ल’) यांना मिळाले. नेपथ्याचा प्रथम पुरस्कार होमीसाईडचे ॲड. प्रशांत देशपांडे यांना तर द्वितीय अंधारडोहचे चेतन बरदिवे यांच्या नावाने जाहीर झाला आहे.
त्याचवेळी रंगभूषेचे प्रथम पारितोषिक निलेश ददगाळ (नाटक – स्वधर्म) तर द्वितीय लालजी श्रीवास (नाटक – थलाई कुत्थल) यांना घोषित झाले. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक गणेश वानखडे (नाटक – ‘द वल्चर अँड द लिटील गर्ल’) आणि शर्वरी ठाकरे (नाटक-होमीसाईड) यांना घोषित झाले असून अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र शिल्पा धुंडियाल, रचना आष्टीकर, संगीता कडू, रिद्धी
चाबुकस्वार, विनोद सुरोसे, प्रसाद खरे, गोपाल दामदार, आकाश पांडे यांना दिले जाईल. या स्पर्धेसाठी चंद्रकांत शिंदे, शशिकांत चौधरी व किर्ती मानेगावकर यांनी काम पाहिले. दरम्यान नाट्य स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि अ.भा. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संघटनेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply