[ad_1]
बीड येथील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याला पुण्यातून आता केजमध्ये नेण्यात आले आहे. तसेच वाल्मीक कराडच्या रिमांडसाठी केज कोर्टात आजच सुनावणी घेण्य
.
अशोक कांबळे यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एन्काऊंटर करण्याची मागणी केली आहे. अशोक कांबळे म्हणाले, संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळताना दिसत नाहीये, कराड नावाचा व्यक्ती कुठे लपला होता? आम्हाला माहीत आहे की तो बीडमध्येच होता. पोलिसांच्या 50 गाड्या काल बीडमध्ये फिरत होत्या. याच लोकांनी त्यांना पुण्यापर्यंत नेले असल्याचा दावा अशोक कांबळे यांनी केला आहे.
पुढे बोलताना अशोक कांबळे म्हणाले, हे सरकार वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी काम करत आहे. संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी हे सरकार काम करत नाहीये. लवकरच आम्ही देशभरातील अन्यायग्रस्त लोकांना बोलावणार आहोत. आझाद मैदनावर निषेधार्थ आम्ही सभा घेऊ. यंत्रणा जर खरेच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी काम करत असतील तर आतापर्यंत वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर झाला असता.
जे जे आरोपी या प्रकरणात आहेत, त्यांचा एन्काऊंटर झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. भर रस्त्यामध्ये आरोपींचा एन्काऊंटर झाला पाहिजे, जे पोलिस हे कृत्य करतील त्यांचे संरक्षण आम्ही करू. जनता कायदा हातात घेणार नाही, जनतेला कायद्याने न्याय मिळवून घ्यायला येतो, असे अशोक कांबळे यांनी म्हंटले आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply