11 वा स्मिता पाटील आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव: 4 आणि 5 जानेवारी रोजी पुण्यात; जगभरातील प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांचे लघुपट पहाण्याची संधी – Pune News

[ad_1]

जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असलेल्या आणि जागतिक पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या ११ व्या स्मिता पाटील आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन आरोग्य सेनेतर्फे शनिवार दिनांक ४ आणि रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय चित्रपट स

.

रसिकांसाठी विनामूल्य खुल्या असलेल्या या महोत्सवात यावर्षी भारतासहित जगातील एकूण २० देशांतून १७५ पेक्षा अधिक लघुपट दाखल झाले. या चित्रपट महोत्सवाला जगभरातील आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांची मान्यता मिळालेली असल्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि अनेक प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले गेलेले व पुरस्कार मिळालेले लघुपट महोत्सवासाठी दाखल झाले. यांत भारता व्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, इराण, स्वित्झर्लंड, इस्टोनिया, झेक रिपब्लिक, इजिप्त, लेबॉनन, कझागिस्तान, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, घाना, फ्रांस, स्पेन, चीन, मलेशिया, इटली, ब्राझिल, इ. देशांतील लघुपट आहेत.

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गगनविहारी बोराटे ,अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि यावर्षीचा ‘रजत कमल’ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सोहिल वैद्य, प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते-लेखक देवशीष मखीजा आणि ज्युलियट ग्रँडमॉट हे बाफ्ता पुरस्कार विजेते, कान महोत्सव सन्मानित फ्रेंच दिग्दर्शक हे यावर्षी महोत्सवाचे मानद ज्यूरी म्हणून काम पहात आहेत. प्राथमिक निवड समिती मध्ये सोहिल वैद्य, योगेश जगम, अनुषा वैद्य, अनिश प्रभूणे, अतिश शिंदे हे काम पहात आहेत.

या दोन दिवसांमध्ये चित्रपट रसिकांना १९ भारतीय व एकूण २० देशांतील २२ असे एकूण ४१ जागतिक दर्जाचे लघुपट पहायला मिळणार आहेत. अंतिम फेरीतील चित्रपटांमधून परितोषिक विजेते निवडण्यात येतात. ‘स्पिफ’ चा पारितोषिक वितरण समारंभ रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड येथे आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख व ‘स्पिफ’ चे संस्थापक-संचालक डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. विनामूल्य खुल्या असलेल्या या चित्रपट महोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेनेतर्फे करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *