[ad_1]
बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड आज अखेर सीआयडीपुढे शरण आला. त्याने पुणे स्थित सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड शरण आला, तेव्हा त्याच्यासोबत 2 जण होत
.
वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी सीआयडीला शरण आल्यानंतर पत्रकारांनी त्याच्यासोबत आलेल्या दोघांना घेरले. यावेळी त्यांनी त्यांना वाल्मीक कराडसोबत तुम्ही कसे? तो तुम्हाला कुठे आढळला? असा प्रश्न केला. त्यावर एकाने अडखळत उत्तर दिले की, आम्ही देवावरून आलो आहोत. वाल्मीक मला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात भेटला. आम्ही तेथून थेट इकडे आलो. त्यानंतर पत्रकारांनी पुन्हा त्यांना 8 दिवस कुठे होतात? असा प्रश्न केला असता, त्यांनी हे आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.
वाल्मीक कराडवरील आरोप धादांत खोटे
यावेळी पत्रकारांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीला छेडले. त्यावर त्याने आपण नगरसेवक शरद मुंडे असल्याचे सांगितले. तसेच आपण परवापासून वाल्मीक मुंडे यांच्यासोबत असल्याचा दावाही केला. ते म्हणाले, मी शरद मुंडे, नगरसेवक आहे. वाल्मीक अण्णा कराड यांच्यावर होणारे सर्व आरोप धादांत खोटे आहेत. मी परवापासून त्यांच्यासोबत आहे. आम्ही इथेच पु्ण्यात होतो. पत्रकारांनी यावेळी त्यांना दुसरा प्रश्न केला असता त्यांनी त्यांना गुन्ह्याविषयी बोलण्याचा आग्रह धरला.
तुम्ही गुन्ह्याविषयी बोला. या प्रकरणातील तथ्याविषयी बोला. पोलिस काय शोधतात? वाल्मीक कराड पोलिसांपुढे हजर झालेत. खोट्या गुन्ह्यात कुणीपण घाबरतो. आम्ही कुठेही गेलो नव्हतो. इथेच होतो, असे शरद मुंडे म्हणाले.
ती स्कॉर्पिओ गाडी कुणाची?
वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात आला, त्या गाडीचा क्रमांक हा MH.23.BG.2231 असा आहे. ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे नामक व्यक्तीच्या नावे आहे. शिवलिंग मोराळे ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील पालीचा रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच तो मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्याची अद्याप पुष्टी झाली नाही.
वाल्मीक कराडने स्वतःवरील आरोप फेटाळले
उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मीक कराड यांनी सीआयडीला शरण येण्यापूर्वी एका व्हिडिओद्वारे आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. ते आपल्या व्हिडिओत म्हणाले, मी वाल्मीक कराड. माझ्याविरोधात बीडच्या केज पोलिस ठाण्यात खंडणीची खोटी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मला अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे.
संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.
दरम्यान, वाल्मीक मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय आहेत. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी या प्रकरणी धनंजय यांना कोंडीत पकडले आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply